मुंबई । वार्ताहर
कोरोना संकटामध्ये राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून वेगवेगळ्या विकासकामाच्या खर्चामध्ये राज्यशासनाने कात्री लावली आहे. राज्याचे राज्यपाल यांनी देखील राजभवनाच्या खर्चामध्ये कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राजभवनामध्ये आर्थिक वर्षाच्या खर्चामध्ये विविध उपाययोजनावर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो त्यावर राज्यपालांनी कात्री लावली आहे.
राज्यपालांनी यासंदर्भात उपाय सुचविले असून त्यामध्ये राजभवनात कोणतेही नवे मोठे बांधकाम सुरू करू नये. केवळ चालू कामेच पूर्ण करावी, पुढील आदेशांपर्यंत राजभवनात येणार्या देशविदेशातील पाहुण्यांना स्वागताच्या वेळी भेटवस्तू वा स्मृतीचिन्ह देऊ नये, पुढील आदेशापर्यंत राजभवनात कोणतीही नवी नोकरभरती करू नये, स्वातंत्र्यदिनी पुण्यातील राजभवन येथे होणारा राज्यपाल आयोजित स्वागत समारंभ यंदा रद्द करण्यात यावा, राजभवनासाठी नवी कार विकत घेण्याचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात यावा ,अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या स्वागताच्या वेळी पुष्पगुच्छ देण्याची प्रथा बंद करण्यात यावी, राजभवन येथील व्हीआयपी अतिथी कक्षांमध्ये फ्लॉवर पॉट तसेच शोभिवंत फुलदाणी ठेवू नये,कुलगुरु व अधिकार्यांसोबतच्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेऊन प्रवास खर्चात बचत करण्यात यावी, आदी उपाययोजना सुचविल्या आहेत.
Leave a comment