बीड | वार्ताहर

कोरोनाच्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील 41 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब आज गुरूवारी (दि.28) सकाळी 6.45 वाजता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन लातूर येथे पाठविण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने ही माहिती दिली.

जिल्हा सामान्य रुग्णालय 27, स्वाराती रुग्णालय अंबाजोगाई-1,ग्रामीण रुग्णालय आष्टी-3, उपजिल्हा रुग्णालय गेवराई-3 आणि परळी उपजिल्हा रुग्णालयातून 7 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान बुधवारी बीड जिल्ह्यातील 45 जणांचे स्वॅब  अहवाल तपासणीला पाठवण्यात आले होते. जिल्हा रुग्णालय प्रशासनाला बुधवारी रात्री उशिरा ते प्राप्त झाले. यातील 1 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर 3 अहवाल अनिर्णयीत आहेत अन्य 41 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.त्यानंतर आता आज सकाळी पाठवलेल्या 41 अहवालांची प्रतीक्षा आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.