किन्ही पोलिस चेक नाक्यावरील आडव्या लावलेल्या ट्रॉलीला धडकून युवक अत्यवस्थ
आष्टी । वार्ताहर
तालुक्यातील सांगवी पाटण या ठिकाणी कोरोनाचे पेशंट सापडल्यामुळे परिसरात बफर झोन लागू करण्यात आला यासाठी किन्ही या ठिकाणी पोलिस चेक नाका उभारण्यात आला या नाक्यावर पोलिसांनी रस्त्याला ट्रॅक्टर ट्रॉली आडवी उभा केली होती काल सायंकाळी साडेआठच्या सुमारास सदरील ट्रॉलीला कीन्ही गावातील कपिल बबन काकडे वय३० या युवकाची जोरदार धडक बसल्याने त्याच्या मानेच्या मणक्याला गंभीर इजा पोहोचल्याने त्याला तातडीने तेथून आष्टी येथील ग्रामीण रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातून अहमदनगरला हलविण्यात आले विशेष बाब म्हणजे या पोलिस चेक नाक्यावर यावेळी कुठलाही पोलिस कर्मचारी किंवा होमगार्ड उपस्थित नव्हता जर पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड या ठिकाणी उपस्थित नसेल तर हा चेक नाका कशासाठी केला आहे हा प्रश्न निर्माण होतो कपिल काकडे हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता यासंदर्भात आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर टेकडे यांच्याशी संपर्क साधला असता सदरील मुलाला मोठ्या प्रमाणात इजा झाली असून त्याची परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले कोरोना च्या महामारी ने लोकात मरण्याची भीती आहे मात्र पोलिसांनी या ठिकाणी चेक नाका करून त्यावर कुठल्याही प्रकारचा कर्मचारी नियुक्त केला नाही किंवा असलेला कर्मचाऱ्याने ड्युटी बजावली नसल्याने या ठिकाणी हा अपघात घडला रस्त्यावर आडवे वाहन लावून पोलीस प्रशासन राम भरोशे कारभार करत असल्याने या युवकाचा जीव धोक्यात आला आहे वाहनाचा अंदाज येत नसल्याने हा अपघात घडला आहे याची सर्वस्वी जबाबदारी त्याठिकाणी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्याची असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे कपिल काकडे याची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने त्याच्यावर कशाप्रकारे उपचार करावेत हा प्रश्न त्याच्या कुटुंबा समोर निर्माण झाला आहे
Leave a comment