राज्यातील संचारबंदीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य ‘पीडीएफ’ स्वरुपात बालभारतीच्या या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे साहित्य विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येणार असून विद्यार्थी घरबसल्या अभ्यास करू शकतील.
संचारबंदीमुळे पुस्तकांचे वितरण करणे बालभारतीला शक्य नसल्याने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीच्या अभ्यासक्रमाचे साहित्य ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अभ्यासक्रमाची पुस्तके संकेतस्थळावर डाऊनलोड करण्यासाठी देण्यात आली आहे. तसेच रेडिओ, दूरचित्रवाणीच्या माध्यमातूनही अभ्यास साहित्य देण्याबाबतची पडताळणी करण्यात येत आहे.
‘या’ विषयांच्या पुस्तकांचा समावेश
ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेल्या पुस्तकांमधे मराठी, हिंदी, संस्कृत, बंगाली, प्राकृत, उर्दु, अरेबिक, सिंधी, कन्नड, तेलुगू, पर्शियन आदी भाषा विषयांसह गणित, विज्ञान, तर्कशास्त्र, जल सुरक्षा, राज्यशास्त्र, चिटणीसाची कार्यपद्धती, अर्थशास्त्र, सहकाल संख्याशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान आदी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पुस्तकांचा समावेश आहे.
‘या’ संकेतस्थळावरुन करता येणार पुस्तकं डाऊनलोड
विद्यार्थ्यांना http://www.ebalbharati.in/ या संकेतस्थळावरून पुस्तके डाऊनलोड करून घेता येतील.
Leave a comment