नवी दिल्ली :-

देशातील दुसरी सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी भारत पेट्रोलियमने (BPCL) गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी नवी सुविधा सुरु केली आहे. आता व्हॉट्सऍपवरुनही गॅस सिलेंडर बुक करता येणार आहे. व्हॉट्सऍपवरुन गॅस सिलेंडर बुक करण्याची सुविधा संपूर्ण देशात सुरु करण्यात आली आहे.

भारत पेट्रोलियमचे (Bharat Petroleum) देशभरात 71 मिलियनहून अधिक गॅस सिलेंडर ग्राहक आहे. गॅस वितरणाच्या बाबतीत भारत पेट्रोलियम इंडियन ऑईलनंतर दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. भारत पेट्रोलियमचा भारत गॅस नावाने घरगुती गॅस सिलेंडर वितरणाचा व्यवसाय आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी, गॅस सिलेंडर बुकिंगसाठी व्हॉट्सऍप सेवा सुरु केली आहे.

भारत गॅसने दिलेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना व्हॉट्सऍप क्रमांक 1800224344वर आपला गॅस सिलेंडर बुक करता येऊ शकतो. गॅस एजेन्सीमध्ये ग्राहकाचा जो फोन नंबर रजिस्टर्ट आहे त्याच फोन नंबरवरुन, व्हॉट्सऍपवरुन गॅस बुक करता येऊ शकतो.

गॅस बुकिंगसाठी व्हॉट्सअप नंबर लॉन्च करताना कंपनीचे विपणन संचालक अर्थात मार्केटिंग डायरेक्टर अरुण सिंह यांनी सांगितलं की, व्हॉट्सऍपच्या सोयीमुळे ग्राहकांना गॅस सिलेंडर बुक करणं अधिक सोपं होईल. व्हॉट्सऍपचा वापर वाढता होत असल्याने, अनेकांना याच्या वापराबाबत माहित असल्याचंही ते म्हणाले.

व्हॉट्सऍपवर सिलेंडर बुक केल्यानंतर ग्राहकाला फोन नंबरवर एक बुकिंग मेसेज येईल. त्या मेसेजमध्ये बुकिंग संख्या असेल. या मेसेजमध्ये गॅस सिलेंडरचं ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीचीही एक लिंक असेल. या लिंकवर ग्राहक डेबिट, क्रेडिट, यूपीआय आणि इतर ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्मवरुनही सिलेंडरची रक्कम भरु शकतात.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.