बीड | वार्ताहर
कोरोनाच्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील 46 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब आज बुधवारी (दि.27) सकाळी 6.45 वाजता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन लातूर येथे पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी दिली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातून - 20, केज उपजिल्हा रुग्णालय- 9, आष्टी ग्रामीण रुग्णालय -2, माजलगाव ग्रामीण रुग्णालय- 5, गेवराई उपजिल्हा रुग्णालय- 3 तर परळी उपजिल्हा रुग्णालयातून 7 जणांच्या स्वॅबचा यात समावेश आहे. रात्रीपर्यंत हे अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त होऊ शकतात.
Leave a comment