बीड | वार्ताहर
पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथे आढळलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बीड शहरतील विवेकानंद हॉस्पिटल, पँराडाईज हॉस्पिटल तसेच दिशा डायग्नोस्टीक सेंटर या तीन ठिकाणी जाऊन आल्याची माहिती मिळाल्यामुळे हे दोन हॉस्पिटल व एक डायग्नोस्टिक सेंटर सील करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहे. त्याचबरोबर या तिन्ही शेजारील भागही कंटेनमेंट झोन घोषित होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनातील सुत्रांनी दिली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारेगाव येथील रुग्ण 18 मे रोजी मुंबईहून ट्रॅव्हल्सद्वारे गावात दाखल झाला होता. त्यांच्यासोबत असलेल्या एकूण 14 प्रवाशांना आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयात आणण्याची प्रक्रीया पूर्ण केली आहे. मंगळवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या हा रुग्ण छातीत दुखत असल्याने बीड शहरातील भाजीमंडी परिसरातील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. इथे त्याने दोन दिवस उपचार पण घेतले. त्या अगोदर तो पॅराडाईज हॉस्पिटल व दिशा डायग्नोस्टिक सेंटरमध्येही जाऊन आलेला असल्याने ही सर्वच ठिकाणे सील करण्याची प्रक्रीया प्रशासनाकडून सुरु करण्यात आली आहे. तसेच त्या काळात हॉस्पिटलमध्ये आलेल्या इतर सर्व रुग्ण यांची माहिती घेण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.
Leave a comment