धारुर । वार्ताहर
बीड जिल्ह्यात दोन महिने कोरोना आला नाही. त्याच संपूर्ण श्रेय जिल्हा प्रशासनाला जात संकटाचा तोंडावर जिल्ह्यात आलेल्या श्रीमान रेखावार यांनी चांगली कामगिरी बजावली जनतेने साथ दिली परिणाम चांगले राहिले मात्र जेंव्हा बाहेरचे लोक आले. पाहूणा घेवूनच आले जिथे एक रुग्ण नाही. त्या बीड मध्ये चाळीशी गाठली हा चिंतेचा विषय आहे. राज्य सरकार जणू काही हात घाईला आले? कोरोना विरोधात लढाईला जनतेलाच भाग पाडत आहे. प्रश्न इतर अनेक असले तरी बीड जिल्ह्यात काल श्रीमान रेखावार साहेबांनी आज पासून कासरा ढिला नव्हे तर सोडून च दिला आहे. खर तर अजून किमान आठ दिवस थांबायला हवे आशी लोकांची पण इच्छा आहे. कारण रुग्णांची संख्या वाढवणार अस भाकित जागतिक अरोग्य संघटनेने पण केल शिवाय फार मोठया प्रमाणावर बाहेरचे लोक आले आणि रुग्ण वाढतात खर तर आपल्या कडे अरोग्य सेवा अपूरी आहे तालुकास्तरावर चांगली सेवा नाही रुग्ण वाढले तर फार मोठा धोका होवू शकतो बाहेरच चित्र भयानक आहे. मग आपण थोडी घाई करता कामा नये. लोकांना लॉक डावूनची सवय झाली त्या नियमाला अधिन राहून जनता सहकार्य करते आहे. कोणी 100% उठवा मागणी केलेली नाही मग हा निर्णय घाईचा वाटतो आज सर्व माध्यमाचा सुर पण तसाच आहे. त्यामुळे काही दिवस थांबा आशी लोक भावना आहे. अता पर्यन्त तुम्ही स्वःता जिल्हा पोलिस अधिक्षक मा. हर्ष साहेब जिल्हा चिकित्सक डॉ.थोरात यांनी चांगले केले पण आजचा निर्णय चुकिचा ठरू शकतो असे जनतेला वाटत आहे.
Leave a comment