मनसे जिल्हाध्यक्षासह तिघांविरुध्द शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा 

बीड । वार्ताहर

वाळू वाहतूकीचा आणि गौण खनिज कर भरल्याचा कोणताही परवाना नसतानाही अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर पोलीसांनी ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या पथकाने बीड शहरातील जालना रोड लगतच्या कॅनाल परिसर व चर्‍हाटा फाटा परिसरात या कारवाया केल्या. दोन वेगवेगळ्या कारवायांत तिघांना पकडले असून आरोपींमध्ये मनसे जिल्हाध्यक्ष वैभव काकडेंचा समावेश आहे. 2 टिप्परसह 11 ब्रास वाळू जप्त करण्यात आली.

सोमवारी (दि.25) रात्री गुन्हे शाखेचे विशेष पथकाने चर्‍हाटा फाटा परिसरातून नगर नाक्याकडे आलेला एक टिप्पर (क्र.एम.एच.16 सीई 9393) पथकाने थांबवला.यात 6 ब्रास वाळू आढळून आली. मात्र वाळू वाहतूकीचा शासनाचा परवाना आढळून आला नाही. चालक जीवन लक्ष्मण इंदूरे (45 रा.दगडी शहाजानपूर,ता.बीड) व मालक वैभव चंद्रकांत काकडे (36 रा.इंद्रप्रस्थ कॉलनी,बीड) या दोघांविरुध्द शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करत टिप्पर व 6 ब्रास वाळू असा 25 लाख 42 हजार रु.किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसरी कारवाई मंगळवारी (दि.26) पहाटे सव्वापाचच्या सुमारास शहालगतच्या कॅनॉल रोडवर केली गेली. टिप्परमधून (क्र.एम.एच.12 के.पी. 8179) 5 ब्रास वाळूची वाहतूक करणार्‍या सुदाम कल्याण सोनलकर (22, रा.शहाजानपूर,ता.बीड) यास ताब्यात घेत विचारणा करण्यात आली.त्याच्याकडे वाळू वाहतूकीचा शासकीय परवाना नव्हता. संबंधितावर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलीसांनी टिप्पर व 5 ब्रास वाळू असा 25 लाख 35 हजार रु.किमंतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर अधीक्षक विजय कबाडे, गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहाय्यक निरीक्षक आनंद कांगुणे, पो.ना.झुंबर गर्जे, पो.ना.सखाराम पवार, पो.कॉ. गोविंद काळे, चालक पो.ना. गहिनीनाथ गर्जे यांनी ही कारवाई केली. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.