लोकडोवनमध्ये गरिबांना दिला मदतीचा हात
शिरूर । वार्ताहर
रायमोह गावातील नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जेष्ट संचालक वसंतराव सानप व त्यांचे बंधू कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भगवान सानप यांनीपंकजाताई मुंडे व मा.खा.प्रीतमताई मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली रायमोह येथील विधवा, निराधार, मोलमजुरी करणारे आशा 200 कुटुंबाना किराणा सामान व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
हे करत असताना कुठेही सामाजिक अंतराचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात आली सानप बंधूनी दाखवलेल्या माणुसकीमुळे सर्व कुटुंबानी त्यांना भरभरून आशिर्वाद दिले. यावेळी गावातील जि.प.सदस्य सुभाष क्षीरसागर, पोलीस पाटील प्रभाकर जाधव, उपसभापती जालिंदर सानप, सभापती राजाभाऊ जाधव, शिवसेना प्रमुख भरत जाधव, तसेच व्हाईस चेअरमन विजयकुमार जाधव, सुलेमान पठाण, साईनाथ सानप, आयुब तांबोळी, शेख बाबूलाल, संजय सानप, भास्कर जगताप, विनोद कुलकर्णी, भागवत नेमाने, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a comment