'महाराष्ट्रातलं सरकार मजबूत आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे'

 

 

नवी दिल्ली :

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, महाराष्ट्रात आम्ही सरकारमध्ये आहोत. पण मोठे निर्णय घेण्याचे आम्हाला अधिकार नाहीत. पण महाराष्ट्रातलं सरकार मजबूत आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे, असं ते म्हणाले.

 

सरकारमध्ये असलो तरी मोठे निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नाही असं म्हणत त्यांनी महाराष्ट्रातल्या कोरोना स्थितीची जबाबदारी  झटकली आहे. पण त्याचवेळी सरकार मजबूत आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे असं सांगत आम्ही ठाकरे सरकारबरोबर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

 

महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मदत मिळाली पाहिजे. आम्ही केवळ केंद्र सरकारला सूचना देऊ शकतो, परंतु सरकारला काय वाटते हे पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे. 

 

मुंबई, दिल्ली ही महत्त्वाची केंद्र असल्याने येथे अनेकांची ये-जा असते, अधिक कनेक्टटेड असलेल्या जागी कोरोनाची स्थिती अधिक आहे. त्यामुळे यांसारख्या शहरांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात आम्ही सरकारमध्ये आहोत मात्र आम्ही मोठे निर्णय घेऊ शकत नाही. परंतु, पंजाब, छत्तीसगड, राजस्थानमध्ये आमच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार असल्याचं ते म्हणाले.

केंद्र सरकारचा राज्य शासनांना पाठिंबा नाही. त्यामुळे राज्य सरकार योग्यरित्या काम करु शकत नसल्याचा आरोप राहुल गांधीं यांनी मंगळवारी पत्रकारांनी संवाद साधताना केला. देशात लॉकडाऊन अयशस्वी ठरल्याचंही ते म्हणाले. लॉकडाऊनचे चारही टप्पे अयशस्वी ठरले आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात ज्याप्रमाणे सूट देण्यात आली आहे त्यामुळे रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. त्यामुळे आता यापुढे प्लान बी कोणता असणार आहे, असा प्रश्न राहुल गांधी यांनी सरकारला केलाय. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.