आमला येथील घटना: सात जणांवर गुन्हा

सिरसाळा । वार्ताहर

पैशाच्या व्यवहारातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. ही घटना रविवारी आमला (ता.धारुर) येथे घडली. परस्परविरोधी फिर्यादीवरुन सिरसाळा पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला.

सिध्देश्वर विठ्ठल सोळंके (30,रा.आमला) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी गावातील व्यायामशाळेजवळ गावातील चौघांनी त्यास अडविले. वडिलांना मूतखड्याच्या शस्त्रक्रियेसाठी दिलेले पैसे त्यांनी परत मागितले. त्यावर सिध्देश्वर सोळंके याने वडिलांनी पैसे परत दिले, आता कशाचे पैसे? असे म्हटले. त्यानंतर सिध्देश्वरवर कोयत्याने हल्ला करुन लाथाबुक्क्याने मारहाण करुन दगड फेकून मारला. या प्रकरणी सिध्देश्वरच्या फिर्यादीवरुन मच्छिंद्र नागनाथ सोळंके, मनोज मच्छिंद्र सोळंके, दादा मच्छिंद्र सोळंके, पांडुरंग आबासाहेब सोळंके यांच्यावर गुन्हा नोंद झाला. मच्छिंद्र नागनाथ सोळंके यांनीही फिर्याद दिली. त्यावरुन सिध्देश्वर विठ्ठल सोळंके, सोमेश्वर विठ्ठल सोळंके, विठ्ठल मारोती सोळंके यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. ‘तू आम्हाला कशाचे पैसे मागतो,’ असे म्हणत दगडाने डोके फोडून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.