आष्टी । वार्ताहर
तालुक्यातील शिरापूर येथे वादळाने नागरिकाच्या घरावरील पत्रे उडून गेले. या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले. सोमवारी (दि.25) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
शिरापूर येथील वस्तीवर राहणार्या सचिन पगारे यांच्या घरावरील वादळाने सोमवारी दुपारी सर्वच पत्रे उडून गेले. तीन खोल्या वरील पत्रे उडून जाऊन त्यांच्या कुटुंबातील नंदा सचिन पगारे, सचिन मारुती पगारे, शिला सचिन बुचूडे, तुकाराम मारुती पगारे हे जखमी झाले असून यातील नंदा पगारे व सचिन पगारे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे दाखल करण्यात आले आहे.सुदैवाने वादळ आले त्यावेळी सचिन पगारे यांचे चार लहान मुले घरीच होती त्यांना कसलीही इजा झाली नाही.
Leave a comment