आरोग्य कर्मचार्यांना मास्क-सँनिटायझरचे वाटपकेज । वार्ताहरकै.आत्माराम बापू पाटील प्रतिष्ठाणला केजचे नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी स्वतः 7 लक्ष रुपयांचा निधी मदतीसाठी दिल्याने या प्रतिष्ठाणच्या माध्यमातून केज शहरात व तालुक्यात कार्यरत असलेल्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्यांना स्वतःच्या काळजीसाठी आवश्यक असलेले मास्क व सँनिटायझर केज उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरुणा केंद्रे, डॉ.वासुदेव नेहरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.कोरोनाशी लढा देण्यासाठी सध्या आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून काम करत आहेत. स्वतःच्या कुटूंबापासून दूर राहून जनतेची सेवा करत आहेत. यासाठी त्यांना आवश्यक असलेले छ-95 मास्क, ट्रिपल लेअर मास्क व सँनिटायझर याचा तुटवडा आहे. मात्र प्रतिष्ठाणच्या वतीने आदित्य पाटील यांनी दिलेल्या निधीतून हे साहित्य खरेदी करून या कर्मचार्यांना मंगळवारी वाटप देण्यात आले यावेळी कै.आत्माराम बापू पाटील प्रतिष्ठानचे पशूपतीनाथ दांगट यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी केजच्या डॉ.अरुणा केंद्रे, डॉ.वासूदेव नेहरकर, डोईफोडे सर, पत्रकार विनोद शिंदे व केज उपजिल्हा रुग्नालय येथील कर्मचारी उपस्थित होते.
Leave a comment