वडवणी । वार्ताहर
गेवराई तालुक्यातील एका तांड्यावरील भगिनीचा विनयभंग करणार्या सरपंचाला दोन दिवसांत तात्काळ अटक केली नाही तर बंजारा समाजातील भगिनीचा चकलंबा पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती सेवालाल सेनेचे अध्यक्ष बी.एम.पवार यांनी दिली आहे.
चकलंबा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका तांड्यावर राहणार्या भगिनीचा पांचाळेश्वर येथील सरपंच उदरभरणे आणि त्याच्या सहकार्यांनी दारुच्या नशेत विनयभंग केला होता. या संदर्भात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा आठ दिवसापूर्वी दाखल केला आहे परंतु विनयभंगातील आरोपींना अटक करण्यात आली नाही ही गंभीर घटना आहे. संबधित आरोपीला राजकीय पक्षांचे नेते पाठबळ देत आहे म्हणून आतापर्यंत त्यांना अटक करण्याचे धाडस पोलिस करित नाही हे लक्षात आले आहे. संबधिताला तात्काळ अटक केली नाही तर आम्हाला लॉडाऊन तोडून पोलिस ठाण्यावर आंदोलन करावे लागणार आहे असा इशारा इशारा बी.एम. पवार यांनी दिला आहे. या पत्रकावर प्रा.पी.टी.चव्हाण, जि.प.सदस्य शरद चव्हाण, जीवन राठोड, रमेश पवार, रोहिदास पवार,विष्णू राठोड, अजय राठोड, शामराव राठोड, गणेश चव्हाण, नरेंद्र राठोड, सरपंच प्रकाश चव्हाण, सरपंच परमेश्वर राठोड, विलास राठोड यांची नावे आहेत
Leave a comment