माजलगांव । वार्ताहर
शार्दुलेश्वर शिक्षण संस्थेतुन निवृत्त झालेले मुख्याध्यापक शेख आरेफ यांनी शार्दुलेश्वर शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व दिंदुड येथील इंदिरा गांधी कन्या विद्यालयातील सर्व आजी माजी विद्यार्थीनींना स्नेहभोजन देवून निवृत्ती घेतली.
आपली सामाजिक बांधीलकीची जाण ठेवत माजलगाव तालुक्या मध्ये शेती, शिक्षण, आरोग्य इतर सामाजीक कार्यात माजी आमदार शिक्षण महर्षि मोहनराव सोळंके यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाने काम करणारी संस्था स्व. दिगांबरराव नारायणराव सोळंके स्मृती प्रतिष्ठाण माजलगाव या संस्थेस सामाजिक कार्या साठी आपल्या पेन्शन मधुन एक लाख रुपये रोख मदत संस्था अध्यक्षा कडे सुपुर्त केली. देणगी स्वीकारताना प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मा.आ.मोहनराव सोळंके, रामानंद लड्डा, कोषाध्यक्ष श्रीकृष्ण सोळंके, संचालक रामकृष्ण सोंळके सर व सेवानिवृत मुख्याध्यापक शेख आरेफ यावेळी शेख आरेफ हे चांगले शिक्षकच नाही तर चांगला माणूस म्हणुन सर्वदुर परिचित आहेत असे गौरव उद्गार मोहनराव काका यानी शेखआरेफ सरां विषयी काढले. संस्थेच्या वतीने रामानंद लड्डा यानी सरांचे आभार व्यक्त मानले.
Leave a comment