पुणे । वार्ताहर
मान्सूनच्या आगमानाची चाहुल लागली असताना दुसरीकडे मात्र राज्यातील विविध भागात उष्णाचे चटके जाणवू लागले आहेत. सुर्य अधिक तळपू लागल्याने हा पुर्ण आठवडा विदर्भात उष्णतेच्या लाटेचा रेड अर्लट जारी करण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण लाट येण्याची शक्यता आहे. राज्यात आज सर्वाधिक तापमान हे नागपूर येथे 46.5 नोंदविले गेले.पुण्यात ही आज तापमानाचा पारा चाळीशी च्या पुढे नोंदविला गेला आहे.
कमाल तापमान 45 अंशापेक्षा अधिक असल्यास तसेच कमाल तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे जाऊन तापमानात सरासरीपेक्षा 4.5 अंशाची वाढ झाल्यास त्या भागात उष्णतेची लाट आल्याचे समजण्यात येते, त्यानूसार विदर्भातील नागपूर,अकोला चंद्रपूर अमरावती वर्धा गोदिया येथे तर मराठवाड्यातील परभणी आणि मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे तापमान 45 अंशाच्या पुढे गेले आहे तर बुलढाणा आणि सातारा येथे तापमान 40 अंशापेक्षा अधिक असून सरासरीपेक्षा 4.5 अंशानी वाढ झाली असल्याने या भागात उष्ण लाट आली आहे.
भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये उष्माघाताची नोंद होऊ शकते. दुसरीकडे, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ आणि तेलंगणातही जोरदार उष्णतेचे वातावरण राहील.यंदाच्या मोसमातील ही सर्वाधिक उष्णतेची लाट असल्याचे म्हटले जाते.त्यामुळे राज्यात अनेक भागात येत्या दोन दिवसात विक्रमी कमाल तापमानाची नोंद होईल.
उत्तरेकडील राज्यामध्ये सुद्धा उष्णतेची लाट येणार आहे.त्यामुळे या भागात सुद्धा पुढील दोन दिवस हे सर्वाधिक तापमानाचे ठरतील असे दिसते.
Leave a comment