नांदेड । वार्ताहर
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना संसार्गाची लागण झाली आहे. त्यामुळे नांदेड येथील उपचारानंतर सोमवार दि. 25 मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास मुंबईकडे हलविण्यात आले. ते या आजारातून बरे व्हावेत, यासाठी त्यांच्या हजारो चाहत्यांकडून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने दि. 5 मे रोजी मुंबई येथे गेले हेाते. मुंबई येथून दि. 19 मे रोजी नांदेड येथे परतल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या शासकीय असो किंवा सार्वत्रिक कार्यक्रमात सहभागी न होता. स्वतःला त्यांनी घरात क्वॉरंटाईन करून घेतले.
अशोक चव्हाण यांना प्रकृतीबाबत अस्वस्थ वाट असल्याने त्यांनी वैद्यकीय अधिकार्यांना कळविले.तपासणी करण्यात आल्यानंतर एका संसर्गाचे लक्षणे त्यांच्यात आढळून आल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून त्यांना रविवारी रात्री एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी मुंबई येथे घेऊन जाण्याचा निर्णय रविवारी रात्रीच झाला होता.
सोमवार दि. 25 मे रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ते पावडेवाडी नाका जवळील एका खासगी रुग्णालयातून बाहेर पडत रुग्णवाहिकेत बसून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. अशोक चव्हाण यांना पाहण्यासाठी रुग्णालयाबाहेर लोक जमा झाले होते. गाडीत बसण्यापूर्वी त्यांनी लोकांना हातवर करत अभिवादन केले. या वेळी शासकीय गाडयांचा ताफ ा सोबत मुंबईच्या दिशेने निघाला.
चव्हाण यांचा बंगाला सॅनिटाझर करण्यास सुरुवात
रविवारी प्राप्तत झालेल्या अहवालानंतर लगेच त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सोमवारी शिवाजी नगर येथील बंगल्यास सॅनिटायझर करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे
Leave a comment