आजपर्यंत 17 स्वॅबचा कोणताही निष्कर्ष नाही
बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यातून सोमवारी (दि.25) एकूण ५६ स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत.आता या अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.रात्री उशीरा याचे अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त होतील अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. दरम्यान सध्या जिल्ह्यात बाधीत रुग्णांवर उपचार सुरू असून यातील 2 जण अति जोखमीचे असल्याचे सांगण्यात आले. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या देखरेखीखाली सर्वांवर उपचार सुरू आहेत असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात म्हणाले.
रविवारपर्यंत जिल्ह्यात एकूण 47 बाधीत रूग्णांची नोंद असून पैकी 1 जण कोरोनामुक्त झालेला असुन एकाचा मृत्यू झाला आहे. तर 6 जणांवर पुणे येथे उपचार सुरू असल्याने बीड जिल्ह्यात उपचार घेणार्या रूग्णांची संख्या 39 इतकी आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात परदेशातून आलेल्या एकूण व्यक्ती 124 असून त्यांपैकी होम क्वारंटाईन झालेल्या व्यक्ती 6 आहेत. होम क्वारंटाईन पूर्ण झालेल्या व्यक्ती 118 तसेच इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईन व्यक्ती 12 आहेत. इतर जिल्ह्यातून आलेल्या आणि होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींची संख्या 11 हजार 174 आहेत, तर 17 जणांच्या अहवालाचा कोणताही निष्कर्ष निघालेला नाही अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली. सोमवारी पाठवलेल्या 56 स्वॅब रिपोर्टची आरोग्य यंत्रणेसह जिल्ह्याला प्रतीक्षा आहे.
Leave a comment