बीड | वार्ताहर
बीड तालुक्यातील साखरे बोरगांव येथे रविवारी (दि.24) कोरोना विषाणूचे लागण झालेले 3 रुग्ण आढळून आले. यामुळे इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार वीड तालूक्यातील साखरे बोरगांव या गावापासून ३ कि.मी. परिसरातील साखरे बोरगांव, वाणगांव व गोगलवाडी हा परिसर कटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे.
आता ही सर्व गावे व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात येत आहे असे जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे.
Leave a comment