बीड ग्रामीणच्या 9 पोलीसांसह 33 जणांचे अहवाल निगेटिव्ह
आता जिल्ह्यात एकुण 39 जणांवर उपचार सुरु
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्याला आणखी मोठा धक्का बसला आहे. रविवारी तपासणीसाठी पाठवलेल्या 40 पैकी 6 जणांचे स्वॅब अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात साखरे बोरगाव (ता.बीड) येथील 3, पाटोदा शहर 1 आणि वडवणी येथील 2 जणांचा समावेश आहे. हे सर्व जण मुंबईहून गावी परतले होते अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्यातून रविवारी एकुण 40 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास हे अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये साखरे बोरगाव (ता.बीड) येथील 3 जणांचा समावेश आहे. यात 48 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला व 13 वर्षीय मुलीचा समावेश आहे. तसेच पाटोदा शहरातील एका 40 वर्षीय पुरुषासह वडवणी येथील 36 वर्षीय पुरुष आणि 30 वर्षीय महिलेचा समावेश आहे. हे सर्व 6 बाधित रुग्ण मुंबईतून गावी परतले आहेत. त्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीला घेण्यात आले होते. दरम्यान उर्वरित 33 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 1 अहवालाचा कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. निगेटिव्ह 33 जणांमध्ये बीड ग्रामीणच्या 9 पोलीसांचाही समावेश आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात परदेशातून आलेल्या एकूण व्यक्ती 124 असून त्यांपैकी होम क्वारंटाईन झालेल्या व्यक्ती 6, होम क्वारंटाईन पूर्ण झालेल्या व्यक्ती 118, इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईन व्यक्ती 12 आहेत. इतर जिल्ह्यातून आलेल्या आणि होम क्वारंटाईन केलेले व्यक्ती 11 हजार 174 आहेत. तर 17 जणांच्या अहवालाचा कोणताही निष्कर्ष निघालेला नाही.
जिल्ह्यातील आत्तापर्यंतचे बाधीत रूग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 41 कोरोनाबाधीतांची नोंद झाली आहे. यातील पिंपळा (ता.आष्टी) येथील रूग्ण कोरोनामुक्त झाला आहे. त्यानंतर इटकूर (ता.गेवराई) येथे 2, हिवरा (ता.माजलगाव) येथे 1, पाटणसांगवी (ता.आष्टी) येथे 7 बाधीत रूग्ण आढळले पैकी एका महिला रूग्णाचा बीडमध्ये मृत्यू तर उर्वरित सहा जण उपचारासाठी पुणे येथे दाखल झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कवडगाव थडी (ता.माजलगाव) 2, सुर्डी (ता.माजलगाव) 1, नित्रुड (ता.माजलगाव) 6, कुंडी (ता.धारूर) 7, वडवणी 2, पाटोदा शहर 1, वहाली (ता.पाटोदा) 2, चंदनसावरगाव (ता.केज) 1, संभाजीनगर बालेपीर बीड येथील 1 रूग्ण, हे सर्व बाधीत रूग्ण मुंबईतून जिल्ह्यात परतलेले आहेत. याशिवाय केळगाव (ता.केज) येथील 1 जण पनवेलमधून तर बीड शहरातील मोमीनपुरा येथील 2 व जयभवानीनगर बीड येथील 1 असे तिघे ठाण्यातून बीडला आलेले आहेत. धनगरवाडी (ता.आष्टी) येथे आढळलेला 1 रूग्ण मुंबईतून आलेला आहे. रविवारी तपासणीसाठी पाठवलेल्या 40 पैकी 6 जणांचे स्वॅब अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात साखरे बोरगाव (ता.बीड) येथील 3, पाटोदा शहर 1 आणि वडवणी येथील 2 जणांचा समावेश आहे. हे सर्व जण मुंबईहून गावी परतले होते. रविवारपर्यंत जिल्ह्यात एकूण 47 बाधीत रूग्णांची नोंद असून पैकी 1 जण कोरोनामुक्त झालेला असुन एकाचा मृत्यू झाला आहे. तर सहा जणांवर पुणे येथे उपचार सुरू असल्याने बीड जिल्ह्यात उपचार घेणार्या रूग्णांची संख्या 39 इतकी आहे.
----
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment