दिंद्रुड । वार्ताहर

तापमान वाढत असतानाच ग्रामीण भागात पाणीप्रश्‍नही बिकट होत चालला आहे. दिंद्रुड ठाणे हद्दीतील बाभळगाव येथे हौदावर पाणी भरण्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरूध्द दिंद्रुड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रमेश ग्यानबा गव्हाणे (रा.बाभळगाव ता.माजलगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास गावातील हौदावर ते पाणी भरत असताना तिथे आलेल्या सात जणांनी पाणी भरण्याच्या कारणावरून रमेश व त्यांच्या सोबतच्या सहकार्‍यांना लाथाबुक्याने मारहाण करत शिवीगाळ केली. जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. गव्हाणे यांच्या तक्रारीवरून तानाजी सोनवणे, सोनाजी सोनवणे, आकाश सोनवणे, धनु सोनवणे, रामभाऊ सोनवणे, दिक्षा सोनवणे व हिराबाई सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.