माजलगाव: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदी लागु आहे. मात्र जिल्हाधिकारी यांच्या या आदेशाचे उल्लंघन करत एकत्र जमून भांडण करणार्या सात जणांविरूध्द माजलगाव ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शुक्रवारी (दि.22) पात्रुड शिवारातील नदीजवळ ही घटना घडली. याप्रकरणी पो.शि.विलास खराडे यांच्या तक्रारीवरून शेख जावेद शेख करीम, शेख माजेद शेख पाशा, सुजायोद्दीन जावोद्दीन शेख व इतर सात (सर्व रा.आनंदगाव ता.माजलगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला.
Leave a comment