आष्टी । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील कडा व परिसरातील विटभट्टीवर काम करणार्या कर्नाटक राज्यातील 64 कामगारांना आष्टी आगाराच्या तीन बसने कडा येथुन तहसीलदार निलीमा थेऊरकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सिमेवर पाठविण्यात आले.
याप्रसंगी तलाठी नवनाथ औंदकर, सरपंच अनिल ढोबळे, वाहतुक नियंत्रक बबन गायकवाड, बंटी गायकवाड, गोकुळसेठ कर्डीले, पत्रकार दिगंबर बोडखे, सुभाष गांगर्डे, युवराज पाटील, रावसाहेब भोजने, फीरोज सय्यद व इतर उपस्थित होते.
Leave a comment