बीड । वार्ताहर
लॉकडाऊनमध्ये आपल्याआईच्या पाचव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने बीड येथील सेवानिवृत्त भूवैज्ञानिक विनायक गोपाळराव लिंबेकर यांनी मा वैष्णोदेवी पॅलेस येथे चालत असलेल्या अन्नछत्रास 25 हजारांची आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
बीड शहरातील पात्रूड गल्लीतील रहिवाशी व सेवानिवृत्त भूवैज्ञानिक विनायक गोपाळराव लिंबेकर यांच्या आई रमाबाई लिंबेकर यांचा पाचवा स्मृती दिन येत्या 29 मे 2020 रोजी असून या स्मृती दिनाच्या निमित्ताने रविवार 24 एप्रिल 2020 रोजी बीड येथील मा वैष्णोदेवी पॅलेस येथे सुरू असलेल्या अन्नछत्रास 25 हजार रुपयांची आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. रविवारी संध्याकाळी लिंबेकर यांनी या अन्नछत्रास भेट देऊन माहिती घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष सोहनी यांना 25 हजार रुपये रोख स्वरुपात आर्थिक मदत दिली आहे. या वेळी वैष्णोदेवी मित्र मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a comment