मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दुसरीडे विरोधी पक्ष असलेला भाजप आंदोलन करतोय तसेच राज्यपालांकडे तक्रारी करतोय. अशा दुहेरी आव्हानांचा मुख्यमंत्री सध्या सामना करत आहेत. या पार्श्वभुमीवर त्यांनी आज पुन्हा जनतेशी संवाद साधला. 

 

रस्त्यावर न उतरता घरुनच प्रार्थना करा आणि राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना करा असे आवाहन मुस्लिम बांधवाना मुख्यमंत्र्यांनी केेले.  कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होतेय. हा विषाणु गुणाकार करत जातो. मे महिन्याच्या शेवटी सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण असू शकतील असा अंदाज केंद्राच्या टीमने व्यक्त केला होता. आजच्या दिवशी राज्यात ३३ हजार ६८६ रुग्ण आहेत. १३ हजार ४०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण ३ लाख ४८ हजार २६ टेस्ट झाल्या. दुर्देवाने १५७७ मृत्यू झाले आहेत.

काहीजण विचारत आहेत पॅकेज का घोषित केलं नाही. आज गोरगरीबांना अन्न मिळणं, उपचार मिळणं हे महत्वाचं आहे. आपण गरीबांना उपचारासाठी मदत केली. शिवभोजन योजनेअंतर्गत पाच रुपयात भोजन दिलं. 7 ते 8 लाख मजूरांना घरी पाठवलं, यासाठी कुठलं पॅकेज द्यायचं? असा सवाल करत पोकळ घोषणा करणारं महाविकास आघाडीचं सरकार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यभरात गोरगरीब, मजूरांसह लाखो लोकांना मदत केली आहे. त्याची जाहिरात करायची का? असा टोला देखील त्यांनी लगावला. आम्ही रोज 80 ट्रेनची मागणी केंद्राकडे केली आहे. मजुरांना घरी पाठवण्याची व्यवस्था करत आहोत. त्यांचा खर्च आम्ही करत आहोत, असं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी सुरुवातीला त्यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहे. जो अंदाज वर्तवण्यात आला त्यापेक्षा खूपच कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. एसटीच्या माध्यमातून लाखो लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेजवळ सोडलं आहे. त्यासाठी 75 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. यासाठी कुठलं पॅकेज घोषित करायचं? असा सवाल देखील त्यांनी केला.

आता कोरोनासोबत जगायचं

आपण हळूहळू आपल्या आयुष्याची गाडी पूर्वपदावर आणत आहोत. मात्र हे करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. लॉकडाऊन अचानक लावणं जसं चुकीचं आहे तसंच लॉकडाऊन अचानक काढणं देखील चूक आहे. आपल्याला आता कोरोनासोबत जगायचं आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कोरोनाने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत, असंही ते म्हणाले.

आकड्यांबाबत आपण अंदाज खोटा ठरवला

राज्यात मे महिन्याच्या अखेरीस सव्वा ते दीड लाख कोरोनाबाधित आढळतील असा अंदाज केंद्राच्या पथकाने नोंदवला होता. मात्र आज राज्यात केवळ 33686 अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यात आजघडीला  47190 कोरोनाबाधित आहेत त्यापैकी 13404 बरे झाले आहेत. आपण शिस्त दाखवली त्यामुळं आपण अंदाज खोटा ठरवला आहे. आपण शिस्त पाळल्यानेच आपण आकडे आटोक्यात आणले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात साडेतीन लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

गुणाकार जीवघेणा होणार

पुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आता गुणाकार जीवघेणा होणार आहे, केसेस वाढणार आहेत. त्यामुळं आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. आपण कोरोनाविरोधात लढाईसाठी सज्ज आहोत. यापुढची कोरोनाविरोधातील राज्याची लढाई अधिक बिकट होणार आहे. कोरोना रुग्णवाढीचा गुणाकार वाढणार असून तो जीवघेणा होणार आहे. आत्तापर्यंत जशी रुग्णसंख्या वाढली तशीच ती पुढील काळातही वाढणार आहे. पण यामुळे घाबरुन जाण्याचं कारण नाही. कारण, यावर मात करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण करीत आहोत. मे अखेरीस 14 हजार बेड उपलब्ध होतील, असं देखील त्यांनी सांगितलं.

कोरोनासोबत जगायचं आहे हे आपल्याला शिकावं लागणार आहे, असं देखील ते म्हणाले.  काहींना अजूनही याचं गांभीर्य कळत नाही. याचा अर्थ काय? ते तुम्हाला समजलं असेल. मास्क सक्तीचा का? हात का धुवायचा? या संदर्भातले बॅनर्स लावले आहेतच, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

 रक्तदान करण्याचं आवाहन

यावेळी त्यांनी रक्तदान करण्याचं आवाहन देखील केलं. दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळ रक्तदान करा. आपण साठा पुरेसा असल्यानं थांबवलं होतं. आता पुन्हा गरज निर्माण झाली आहे. रक्तदान करणाऱ्यांनी पुढं यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. आता पावसाळा येईल त्यामुळं इतर साथीच्या रोगांपासून देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे, असं ठाकरे म्हणाले. अंगावर दुखणं काढू नका, लक्षणं दिसत असतील तर लगेच डॉक्टरांशी संपर्क करा. शेवटच्या टप्प्यात आल्यावर किंवा लक्षणं वाढल्यावर अनेकजण येतात. त्यामुळं अनेक मृत्यू झाले आहेत. वेळेवर उपचार मिळाल्याने आणि प्राथमिक आल्यावर जास्तीत जास्त लोकं बरी होत आहेत, असं ते म्हणाले.

मुंबईत कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या महिलांची बालकं कोरोना निगेटीव्ह आल्याचे वृत्त ऐकून आनंद झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

आधी आरोग्य सुविधा देतो नंतर पॅकेज देतो.

पोकळ घोषणा करणारं हे सरकार नाही.

 

राज्याने आतापर्यंत ४८१ ट्रेन सोडल्या. यामध्ये ७ लाखापर्यंत प्रवासी मजुरांची सोय केली. राज्य सरकारने ८५ कोटी रुपये दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

रोज ८० ट्रेनची मागणी करतोय पण आपल्याला ३० ते ४० ट्रेन आपल्याला दिल्या जात आहेत. 

सर्व मजुरांची नीट सोय करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तिकिट घेतलेलं नाही. केंद्राची वाट न बघता राज्याने खर्च केलाय.

रस्त्याने मजुर निघाले होते. एसटी ने रस्त्याने जाणाऱ्या लोकांना स्थानकापर्यंत तसेच परराज्यापर्यंत सोडण्यात आले. ५ ते २३ मे पर्यंत एसटीच्या ३२ हजार फेऱ्या झाल्या. यामध्ये एसटीच्या माध्यमातून ३ लाख ८० हजार मजुरांना त्यांच्या स्थानक किंवा घरापर्यंत सोडले. यांच्यासाठी राज्य सरकारने ७५ कोटी खर्च केला आहे. 

इतर राज्यातल्या मजुरांना आपण जा सांगितलं नाही. त्यांना घरी जायचं होतं. आपण केंद्राकडे परवानगी मागितली पण तेव्हा मिळाली नाही. आता हे संकट वाढल्यानंतर ही परवानगी मिळाली. 

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा निर्णय देखील व्यवस्थित घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

जवळपास ५० हजार उद्योग सुरु झाले. रोजगार हमी योजनेअंतर्गत काम सुरु झाले आहे. ग्रीन झोनमध्ये जिल्हा अंतर्गत एसटी सेवा सुरु आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

50 हजाराच्या आसपास उद्योग सुरू केले आहेत. तर सहा लाख कामगार
कामावर रुजू झाले आहेत
* पुढल्या पंधरा दिवसात आपल्या देशाचं खरं चित्र समोर येईल
* शाळा पुढे गेल्या तरी शिक्षण कसं सुरू करायचं याचा विचार सुरू आहे.
* एअरपोर्ट सुरू करायचं पण आम्हाला त्याआधी थोडी खबरदारी घ्यायची
आहे.
* एसटीच्या माध्यमातून 3 लाख 80 हजार लोकांना इच्छित स्थळी सोडले.
त्यावर 75 कोटी खर्च झाला.
* एसटीच्या 5 मे ते 23 मे पर्यंत 32 लाख फेऱ्या झाल्या आहेत.
एसटीने देखील मोठं काम केलं आहे. दिशाहिन जाणाऱ्या मजूरांना त्यांच्या
अपेक्षित ठिकाणी सोडलं
* रोजी 80 ट्रेन्सची मागणी करतोय पण आपल्याला अवघ्या 30 ते 40
ट्रेन्स मिळतायत
* राज्याने आतापर्यंत 481 ट्रेन सोडल्या आहेत. सहा ते सात लाख मजूरांची
सोय केलेली आहे.
ट्रेन्स आपण लॉकडाऊनच्या आधी मागत होतो. आता हे संकट
वाढल्यानंतर हे ट्रेन सुरू केल्या
* पॅकेज काय आहे ते घोषित करायचं? जाहीरात करायचं? की फक्त मदत
करायची, प्रत्यक्षात काम करायचं
पॅकेज आलं. पण त्या पॅकेज उघडलं तर त्यात काहीच नाही. तो फक्त
खोका
* महापालिकेकडून घरोघरी जाऊन अशी काही लक्षणं आहेत का याचे
सर्वेक्षण सुरू असते.
आपला प्रयत्न हाच आहे की व्हायरस आपल्याकडे पोहोचायच्या आत
आपण त्याच्याकडे पोहचायचे
* आजारावर औषध नसलं तरी वेळेत उपचार घेतले तर हा आजार लवकर
बरा होतो
वेळेत उपचार घेतल्यामुळे रुग्ण लवकर बरे होतात
ही लक्षणं समोर आल्यानंतर तत्काळ डॉक्टरकडे जा.
सर्दी खोकला ताप याच्यासोबतच तोंडाची चव जाते, थकवा जाणवते,
वास येत नाही ही देखील कोरोनाची प्राथमिक लक्षणं आहेत.
* पावसाळ्यात येणार्या साथीच्या आजारांपासून लांब राहा
* पावसाळात खबरदारी घ्यायची आहे. उगाच पावसात भिजू नये, पाणी
उकळून प्यावे,
* महाराष्ट्राच्या रक्तात लढण्याची जिद्द कशी आहे ते दाखवून द्यावं
पुन्हा एकदा रक्तदानाची गरज, सध्या फक्त 8 ते 10 दिवस पुरेल एवढेच
रक्त आहे.
* फिल्ड हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर्सची ऑक्सिजनची सोय करतोय
* रुग्णांची आबाळ होतेय हे सत्य आहे. मात्र हे रुग्ण फार मोठे आहे. आता
आपल्याकडे फिल्ड हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत.
* आपण काही लाखांमध्ये रुग्णशय्या तयार केल्या आहेत.
* या पुढची लढाई अधिक बिकट होणार, केसेस वाढण्याची शक्यता आहे.
* साडे तीन लाखाच्या आसपास टेस्ट झाल्या आहेत.
* एकूण आकडा जरी 47 हजार असला तरी 13 हजार 47 रुग्ण बरे होऊन
घरी गेली आहेत
* महाराष्ट्रात 33 हजार 786 अः क्टिव्ह रुग्ण आहेत.
* सव्वा लाख रुग्ण अपेक्षित होते मात्र आता प्रत्यक्षात 33 हजार रुग्ण
आहेत.
किमान दीड लाख रुग्ण महाराष्ट्रात होऊ शकतो अशी भीती केंद्रीय
पथकाने व्यक्त केली होती.
 गेल्या काही दिवसात पॉझिटिव्ह केसेसची संख्या वाढली आहे,
* काही जणांना या परिस्थितीचं गांभिर्य नाहीए
ईदच्या दिवशी मी सर्वांना आवाहन करतो की ईद घरातल्या घरात प्रार्थना
करा. कोरोना लवकर नष्ट होवो अशी दुआ मागा
* होळीनंतर कोरोनाची बोंबाबोंब सुरू झाली त्यामुळे आपले सर्व सण
शांततेत साजरे केले
मी नियमित आपल्यासमोर येतोय. आपले धन्यवाद करतोय. त्यासोबतच
कोरोनाबाबतचे अपडेट देतोय

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.