ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या अहवालात बीड पोलीस दलाचाही गौरव 

बीड । वार्ताहर

विश्वविख्यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, युनायटेड किंगडम यांनी वार्षिक पब्लिकेशनमध्ये बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या कामगिरीचा उल्लेख करत एक विस्तारित अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये राजकीयदृष्ट्या संवेदनशील बीड जिल्ह्याच्या 2019 मधील राज्य निवडणुका बीड जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट हाताळल्या बाबतची विशेष प्रशंसा केली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सन 2009 मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत मास्टर ऑफ लॉ या पदवीचे शिक्षण घेतले आहे. यासह त्यांनी मालेगावमध्ये असताना केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचाही या अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. 

हर्ष पोद्दार पोद्दार यांनी एसपी म्हणून काम करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना गतवर्षी राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणार्‍या बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ते विधानसभेच्या निवडणूकांची स्थिती त्यांनी शांततापूर्वक हाताळली. ग्रामीण भागातील मतदारांवर परिणाम होऊ शकणार्‍या गुन्हेगारी घटकांवर आळा घालण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या. मतदारांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण केला. बीड जिल्ह्यातील असुरक्षित मतदारांना आश्वस्त करुन देणारा एक लघुचित्रपट तयार केला, ज्यामध्ये पोलिस प्रत्येक नागरिकांना त्यांच्या मताधिकाराचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहेत असा संदेश देण्यात आला. हे करत असताना एसपी हर्ष पोद्दार यांनी कम्युनिटी पोलिसिंगची संकल्पना आखली. त्यालाच महाराष्ट्र पोलिस युवा संसद म्हणून ओळखले जाते. ग्रामीण तरुणांनी गुन्हेगारीपासून दूर राहिले पाहिजे याबाबतची जनजागृती करण्यासाठी हा प्रकल्प माध्यम ठरला. तरुणांना प्रेरणा देणारे हे उपक्रम हर्ष पोद्दार यांच्या संकल्पनेतून राबवले गेले. त्याचा परिणाम इतका मोठा झाला की, हे प्रकल्प इतर जिल्ह्यांत राबवले गेले. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांकडून गुन्हेगारीविरूद्ध दोन लाखांहून अधिक तरुणांचा युवकांचा विकास झाला. याचा उल्लेख ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वार्षिक अहवालात केेला गेला आहे. 

हर्ष पोद्दार हे मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी दंगली आणि इतर प्रश्‍न हाताळण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करत यंत्रणेचे यशस्वी नेतृत्व केले, आदि अनेक मुद्द्यांचा विशेष गौरव अहवालातून केला गेला आहे. तेथे त्यांनी  ‘उडान’ हा प्रकल्प राबवला. तरुणांना पोलिसांच्या सहकार्याने मोफत मार्गदर्शन पुरविणारा प्रकल्पही सुरू केला. तरुणांना त्यांच्या रोजगारक्षम आकांक्षा साकार करण्यासाठी  हिंसाचाराच्या पलीकडे पाहण्याची प्रेरणा देणे ही त्यामागील कल्पना होती. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचे जनतेमधील हे कार्य त्यांच्या पिढीतील सर्वात प्रभावी लोकसेवक म्हणून व्यापक मान्यता मिळाली असल्याचे या आंतरराष्ट्रीय वार्षिक अहवालात उल्लेखित करण्यात आले. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.