औरंगाबाद । वार्ताहर

राजकारणात कधी काय होईल आणि कधी कोण कसा निर्णय घेईल याचा राजकीय अंदाज बांधता येणे अलीकडच्या काळात अशक्य होवून बसले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे औरंगाबाद ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी आता वेगळी भूमिका घेत सर्वांनाच चकीत केले आहे. 

त्याचे झाले असे की, हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, लॉकडाऊन सुरु आहे, सर्वजण आपापले छंद जोपासत आहे. मीदेखील आध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला, आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्या कितपत खर्‍या आहेत याची जाणीव मला झाली. त्यामुळे मी राजकारणातून निवृत्त होत असल्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी म्हणून पत्नी संजना जाधव यांची निवड केली आहे. प्रत्येक घरात कुरघोडी होत असतात, आमच्याही घरात झाल्या, पण याचा अर्थ असा नाही की वेगळ्या गोष्टी घडत असतील. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात संजना जाधव निश्चित चांगल्याप्रकारे काम करेल, यापुढे काही सामाजिक, राजकीय, शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी थेट संपर्क साधावा, मीदेखील खंबीरपणे संजनाच्या पाठिशी उभा आहे असं हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले आहे. 

हर्षवर्धन जाधव यांनी अलीकडेचमनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत अधिकृतरित्या प्रवेश केला होता. त्यानंतर जाधव यांच्याकडे औरंगाबादच्या ग्रामीण भागाची जबाबदारी देण्यात आली होती.त्यापूर्वी हर्षवर्धन जाधव हे कन्नड तालुक्यातील मनसेचे पहिले आमदार होते. त्यानंतर पक्षांतर्गत नाराजीमुळे त्यांनी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला.  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचा राजीनामा देत स्वत:चा राजकीय पक्षदेखील काढला होता. त्याचसोबत 2019 च्या औरंगाबाद लोकसभेतून अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी दुसर्‍या क्रमांकाची मते घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.