बीड | वार्ताहर
येथील विलगीकरण कक्षात स्वॅब घेतलेल्या एका 19 वर्षीय तरुणाचा गुरुवारी रात्री अचानक मृत्यू झाला होता. या रुग्णाचा स्वब अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
गुरुवारी (दि.21) रात्री नऊच्या सुमारास आष्टी तालुक्यातील एक व्यक्ती कोरोनाच्या संशयावरून जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल झाला. त्या तरुणाची प्रकृती बघता आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याचा स्वॅब घेतला. त्यानंतर त्या तरुणाची आरोग्य तपासणी सुरू असताना अचानक त्याचा मृत्यू झाला .डोळ्यादेखत एका व्यक्तीचा अचानक झालेला मृत्यू पाहून उपस्थित कर्मचारी देखील हतबल गेले होते.
या व्यक्तीच्या स्वॅब अहवालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते मात्र त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Leave a comment