सात अहवाल प्रलंबित
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात उपचार घेणार्या एकुण बाधित रुग्णांची संख्या 29 झालेली आहे. शुक्रवारी (दि.22) एकुण 42 जणांचे स्वॅब तपासणीसाठी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठवण्यात आले होते. रात्री हे रिपोर्ट प्राप्त झाले. यातील 35 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 7 जणांचे स्वॅब रिपोर्ट प्रलंबित असल्याचे लातूरच्या प्रयोगशाळेतून सांगण्यात आले. दरम्यान गुरुवारी पाठवलेले 35 पैकी 32 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर 3 प्रलंबित आहेत.
शुक्रवारी बीड जिल्हा रुग्णालयातून 20, केजमधून 7 तसेच माजलगावमधून 14 तर आष्टी येथून एका व्यक्तीचा स्वॅब तपासणीला पाठवण्यात आला होता. यातील 35 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असून 7 अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान बीड जिल्ह्यात आजपर्यंत 37 बाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 6 जण पुणे येथेने स्वेच्छेने उपचारासाठी रवाना झाले. तर एका रुग्णाचा मृत्यू व एक कोरोनामुक्त झालेला असून 29 जणांवर जिल्ह्यात उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत 761 थ्रोट स्वॅब नमुने तपासण्यात आले असून पैकी 672 स्वब नमुने कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत तर 37 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोणताही निष्कर्ष न निघालेल्या अहवालांची संख्या 10 आहे. असे आरोग्य विभागाकडून सांगडण्यात आले.
सर्वच बाधित मुंबई रिर्टन!
बीड जिल्ह्यात मागील पाच दिवसात एकुण 37 जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. हे सर्वच लोक मुंबई ठाणे, पनवेल या भागातून आलेले असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे.
-------
Leave a comment