धारुर । वार्ताहर
धारूर शहरात प्रभाग एक मधील सुरक्षा समितीने या भागात होम क्वॉरंटाईन असणारे नागरिकांच्या व नविन आलेल्या माञ नोंदणी न केलेल्यांची भेट घेऊन आरोग्य तपासणी करून दक्षता बाळगण्याच्या सुचना दिल्या व प्रशासनास सहकार्य करण्याचे सुचना दिल्या. धारूर शहरातील प्रभाग एक मधील सुरक्षा समितीचे सर्व सदस्य व नगरपरीषद कर्मचारी यांनी वैद्यनाथ नगर आशोक नगर भागात घरोघर जाऊन मुंबई पुणे व इतर शहरातून आलेल्या व्यक्तीची चौकशी करून होम क्वॉरंटाईनमध्ये असणार्या सुचनांचे पालन करण्याचे सुचना दिल्या ज्यांनी अद्याप नोंदणी आल्याची केली नाही त्यांची नोंदणी करून ग्रामीण रुग्नालयात जाऊन तपासणी करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी समितीचे अध्यक्ष नगरसेवक बालाजी चव्हाण, पञकार अनिल महाजन, आनंद कंकाळ, विलास शिंदे, न.प. कार्यालय अधिक्षक नितिन इजाते समिति समन्वयक वैजनाथ चोपडे हे उपस्थीत होते.
Leave a comment