केज । वार्ताहर

केज तालुक्यातील दलित चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात सर यांच्या मुलाचा आदर्श मंगल परिणय अत्यंत सध्या पद्धतीने आणि अवघ्या पंधरा ते वीस अशा मोजक्या नातेवाईकांच्या संपन्न झाला. यावेळी वधू-वरासह सर्वांच्या तोंडाला मास्क होते. सारणी (आंनदगाव) येथील चंद्रकांत खरात व सौ. छायाताई खरात यांचे द्वितीय चिरंजीव रोहन हा विज्ञात शाखेतील पदवीसह डीएमएलटीचे शिक्षण घेतले आहे. तर बीड तालुक्यातील साखरे बोरगाव येथील सिताराम जाधव यांची कन्या हर्षदा हिचे पण नर्सिंचे शिक्षण झालेले आहे.या दोघांचा मंगल परिणय दोन्ही कुटुंबातील मोजक्याच नातेवाईकसह म्हणजे अवघ्या पंधरा ते वीस नातेवाईकांच्या उपस्थित संपन्न झाला. या प्रसंगी वधूवरांनी तोंडाला मास्क लावून एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातला. उपस्थितांनी त्याना आशीर्वाद दिले. हा मंगलपरिणय बौद्धचार्य अरुण पटेकर यांनी पार पाडला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.