माजलगाव । वार्ताहर
राष्ट्रीय संत सुरक्षा परिषेदेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी राजराजेश्वर गिरीजी महाराज यांच्या आदेशाने राष्ट्रीय महासचिव स्वामी डॉ. पद्मनाभ गिरी महाराज यांनी राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद पदी बीड जिल्हा प्रवक्तापदी महंत दत्तात्रय गिरी महाराज यांची निवड करण्यात आली आहे.महंत दत्तात्रय गिरी महाराज यांनी दशनम गोसावी समाज भूषण पुरस्कार, वारकरी साहित्य परिषद सरचिटणीस बीड असे अनेक पदे भूषवले आहेत. निवडीबद्दल राजेंद्र बन,दादासाहेब बन, संपत पुरी,भास्कर गिरी,सुर्येकांत गिरी,भीमाशंकर गिरी, प्रा लक्ष्मण गिरी,राम गिरी,गोरख पुरी,कॅप्टन प्रभाकर गिरी,अशोक गिरी,रवी बन,कैलास गिरी,दत्ता गिरी,दिगंबर गिरी आदींसह समाज बांधवांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Leave a comment