बीड । वार्ताहर
जिल्हा प्रशासन कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जीवाचे रान करत असुन सर्व नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येत आहेत याचाच एक महत्वाचा भाग म्हणुन जिल्ह्यातील दिव्यांग , जेष्ठ नागरीक , निराश्रीत आणि बेघर व्यक्ती साठी सामाजिक न्याय विभागाने कंबर कसली आहे या नागरिकांना अडचण येऊ नये म्हणुन समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त डॉ सचिन मडावी आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजु एडके यांच्या नेतृत्वात नियंत्रण कक्ष स्थापन केला असुन या कक्षाच्या माध्यमातुन दिव्यांग व्यक्तीस येणाऱ्या अडचणी सोडवल्या जात आहेत .
कोरोना वर प्रतिबंध मिळवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाऊन सुरू असुन याचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना होऊ नये म्हणुन प्रशासन जिकरिचे प्रयत्न करत आहे या मधे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती , जेष्ठ नागरीक , बेघर व्यक्ती , भिक्षेकरी , निराधार व्यक्ती यांना ही त्रास होऊ नये म्हणुन पालक मंत्री मा ना धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या त्या नुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ सचिन मडावी आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजु एडके यांचे वर ही जबाबदारी सोपवली आणि या दोन्ही कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी स्वीकारून कामाला सुरुवात केली , सर्वात प्रथम या अधिकाऱ्यांनी जिल्हा स्तरावर एक नियंत्रण कक्ष स्थापन करून याचं नियंत्रण स्वतः डॉ मडावी यांनी स्वतः कडे घेतले तर जिल्हा समन्वयक म्हणुन जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजु एडके यांनी जबाबदारी स्वीकारून जिल्ह्यातील दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक यांना तालुका समन्वयक म्हणुन नियुक्त केले आहे .
ही सर्व टीम जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती , जेष्ठ नागरीक , बेघर व्यक्ती यांना येणाऱ्या अडचणी सोडवत आहेत , या कामी डॉ सचिन मडावी आणि राजु एडके हे दोन्ही अधिकारी थेट लाभार्थ्यांना भेटून अडचणी समजुन घेऊन त्या सोडवत आहेत .या अधिकाऱ्यांनी सर्व प्रथम बीड शहरातील सर्व बेघर व्यक्तींना निवार्यात नेऊन ठेवुन त्यांची व्यवस्था केली इतकच नव्हे तर एका भिक्षेकर्याचे वाढलेले केस आणि दाढी करण्यासाठी सलून दुकान बंद असल्याने डॉ मडावी यांनी स्वतः साहित्य उपलब्ध केले आणि या भिक्षेकर्याची संपूर्ण स्वच्छता केली , तर राजु एडके यांनी या बेघराण्ची रहाण्याची व भोजण्याची व्यवस्था केली .
अंबाजोगाई तालुक्यातील घाट नान्दुर येथे एक व्रूद्धाश्रम चालतो या लॉक डाऊन च्या काळात या ठिकाणचे खायचे साहित्य संपले होते याची माहिती राजु एडके यांना मिळताच त्यांनी अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते आणि स्वतः दिव्यांग असणारे संभाजी लांडे आणि बौधवर्धिणी मतिमंद विद्यालयाचे शिक्षक उद्धव कदम यांचे मदतीने या व्रूद्धाश्रमास आवश्यक ते साहित्य पुरविले तर तालुका समन्वयक विजय शिंदे यांचे मदतीने एका अंध व्यक्तीस जीवनावश्यक वस्तु पुरविल्या केज येथील अपंग शाळेचे कर्मचारी हण्डीबाग हे आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन केज तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती ना आवश्यक असणारे सर्व साहित्य पुरवत आहेत .
या सर्व टीम मुळे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती , जेष्ठ नागरीक , बेघर व भिक्षेकरी यांना मदत मिळत आहे या कामी सामाजिक कार्यकर्ते हरी गिरी यांचीही मोठी मदत मिळत आहे .
Leave a comment