डोंगरकीन्ही । वार्ताहर

आष्टी पाटोदा शिरूर चे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या  व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी वेलफेयर ट्रस्ट च्या माध्यमातून जी प उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज डोंगरकीन्ही येथे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सर्व ‘आशावर्कर’ यांना फेस शिल्ड चे वाटप केले. 

कोरोना च्या लॉकडाऊन काळात ‘आशावर्कर’ वर स्थंलातरीत नागरीकांची फार मोठी  जबाबदारी आहे. ‘आशावर्कर ’ या लॉकडाऊनकाळात बाहेरुन आलेल्या नागरिकांच्या नोंदी तसेच त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी फक्त मास्क लाऊन कर्तव्य करतात. आरोग्य विभागाच्या त्या ख-या मार्गदर्शक आहेत. परंतु त्यांना कसलीही सुरक्षा नाही. या रणरागिणीसाठी आ आजबे हे मदतीला धावले आहेत. सर्व आशा वर्कर्स यांना फेस शिल्ड व सॅनीटायझरचे वाटप केले. याप्रसंगी डॉ भोंडवे मॅडम व  सतीश मिस्सर, तसेच माजी सरपंच आर आर येवले. राष्ट्रवादी युवा नेते डॉ.दुशांत भैय्या येवले, युवा जेष्ठ नेते मधुकरआप्पा येवले. धनंजय इंगळे. विठ्ठल चव्हाण, अमोल पाटील येवले, मोरजळवाडीचे युवा नेते बाबा सातपुते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.