पळसदेव -

उजनी धरणातून विविध कारणासाठी वारेमाप पाणी सोडून धरण मोकळे करण्याचा सपाट लावला आहे. गेल्या पावसाळ्यात 100 टक्‍के धरण भरले तरीपण दरवर्षीप्रमाणे यंदाही उजनी काठच्या गावांमधील ऐन उन्हाळ्यातील पाण्याची समस्या मिटलेली नाही.

उजनी धरणाच्या निर्मितीसाठी या भागातील शेतकऱ्यांनी सुपीक जमिनी धरणासाठी दिल्या. मात्र, याच धरणग्रस्तांना दरवर्षी उन्हाळ्यात शेतीच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष पाचवीलाच पुजला असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

उजनी धरणग्रस्तांना त्यांच्या हक्‍काचे पाणी राखीव ठेवण्यात यावे यासाठी यापूर्वी अनेकवेळा आंदोलन झाली, मोर्चे निघाले मात्र धरणग्रस्तांच्या पदरी पाण्याऐवजी केवळ आश्‍वासनेच पडली. उजनी धरणासाठी योगदान देणारे खऱ्या धरणग्रस्तांना सध्या पाण्यासाठी उजनी काठावर मोठी धावपळ करावी लागत आहे. उजनी काठावरील शेतकरी पाण्यासाठी केवळ पाइप वाढवून अगदी मेटाकुटीला आला आहे.

शेतकरी न्यायालयीन लढाईच्या तयारीत 
दरवर्षी शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची दरवर्षी धडपड सुरू असून ना खाते ना मंत्री त्यांच्याकडे लक्ष देत. केवळ लेखी व तोंडी कोरड्या आश्‍वासनांशिवाय त्यांना काहीच मिळत नसल्याने अखेर या शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य मंत्र्यांकडेलागले डोळे 
उजनी धरणग्रस्तांच्या हक्‍काच्या पाण्याचा विषय माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या काळात मार्गी लागला नसून तो अद्यापही प्रलंबितच आहे. तर आता नव्याने राज्यमंत्री झालेले दत्तात्रय भरणे तरी हा प्रश्‍न मार्गी लावणार की त्यांचेही 'ये रे माझ्या मागल्या' होणार हे पाहावे लागणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.