जालना । वार्ताहर
जालना जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. आज सकाळीच प्राप्त झालेल्या अहवालात नवीन जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत असून सामूहिक संसर्गाचा धोका वेगाने वाढत आहे.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १३७ संशयीत रुग्णांचे लाळेचे नमुने घेऊन ते औरंगाबाद येथील प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. याबाबतचा अहवाल आज सकाळीच प्राप्त झाला आहे. भोकरदन येथे ठेवण्यात आलेल्या राज्य राखीव दलातील ६२ जवान, नवीन जालना भागातील खाजगी रुग्णालयाशी संबधित २५ , जिल्हा रुग्णालयातील ३२, मंठा तालुक्यातील पेवा येथील १५ आणि परतूर येथील २ अशा १३७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालात जुना जालना भागातील एका खाजगी रुग्णालयातील चार कर्मचारी,नवीन जालना भागातील एका खाजगी रुग्णालयातील एक,भोकरदन येथील एक जवान आणि मंठा तालुक्यातील पेवा येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेला एक जण असे एकूण सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. या सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने अर्धशतक पूर्ण केले आहे.
Leave a comment