जळगाव –
देशभरात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामध्ये महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आज ‘माझे अंगण, माझे रणांगण’ आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार आज राज्यभरात सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. यानुसार, भाजपच्या नेत्यांनी राज्यभरात आपआपल्या घराच्या अंगणात, कार्यालयाबाहेर काळ्या फिती बांधून, ठाकरे सरकारविरोधातील घोषणांचे फलक हातात घेऊन उभे राहिले आहेत.
राज्यभरात भाजपचे आंदोलन सुरु असताना नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. खडसे आंदोलनात सहभाग घेणार कि नाही याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. आज एकनाथ खडसे यांनी जळगावातील मुक्ताईनगरात आपल्या घरासमोर अंगणात उतरुन, महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार, महाराष्ट्राची जनता मरणाच्या दारात, पण उद्धव सरकार मात्र आपल्या घरात, कोरोना रोखण्यात पूर्ण निष्फळ उद्धव सरकारचा धिक्कार, कोरोनाचे संकट होतंय फारच गडद, गोरगरिबाला सोडले वाऱ्यावर, असे काही फलक घेऊन खडसे आणि मोजके कार्यकर्ते आणि सोबत खासदार रक्षा खडसे यांनीही यावेळी उभे होते.
Leave a comment