सोशल मीडियावर पेड गँग तयार करुन आपण 

लढाई जिंकू असं सरकारला वाटत आहे - देवेंद्र फडणवीस

नागपूर । वार्ताहर

देशातील 20 टक्के करोना रुग्ण महाराष्ट्रात असून राज्य सरकारची निष्क्रियता सातत्याने पहायला मिळत आहे. राज्य सरकार आणि त्यांचे मंत्री आभासी जगात जगत आहे. करोना रुग्णांची संख्या रोज वेगाने वाढत आहे. यामधून राज्य सरकारची निष्क्रियता पहायला मिळत आहे. पण ग्राऊंट रिअ‍ॅलिटी वेगळी आहे. मोठ्या प्रमाणात जनता, लोकांमध्ये अंसतोष निर्माण झाला आहे. करोना रुग्णांना उपचार मिळत नाही आहेत.आठ-आठ तास त्यांना रस्त्यांवर फिरावं लागतं. रुग्णवाहिका मिळत नाही. सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल होण्यासाठी जागा नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

शुक्रवारी राज्यभरात भाजपाकडून माझे अंगण माझे रणांगण हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी राज्य सरकारवर टिकेची झोड उडवली. मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका करताना सोशल मीडियावर पेड गँग तयार करुन आपण लढाई जिंकू असं सरकारला वाटत असल्याचा आरोपीही केला.फडणवीस म्हणाले, खासगी रुग्णालयांचे दर 30 हजारापासून सुरु होत आहेत. कल्याण-डोंबिवली, ठाण्यासारख्या ठिकाणी आयसीयूचे दिवसाला 10 हजार रुपये घेतले जात आहेत. सामान्य नागरिकाला उपचार घेणं शक्य होत नाही आहे.

करोना रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण देशात चार टक्के असून महाराष्ट्रात 12.5 तर मुंबईत 13.5 टक्के आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात, मुंबईत करोनाचा प्रसार झाला आहे. सगळ्या महानगर, महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात करोना पसरला असून राज्य सरकारची त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी कोणतीही तयारी नाही. बीकेसी सेंटर तर दोन दिवसात भरुन जाईल अशी परिस्थिती आहे. पाऊस पडल्यावर काय करणार माहिती नाही. तो प्रश्नही उभा राहणार आहे. रुग्ण व्यवस्थेसंदर्भात राज्य सरकारकडून कोणतीही योग्य पाऊलं उचलली जात नाही आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.केंद्र सरकारने 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. पण राज्य सरकारच्या वतीने एका दमडीचंही पॅकेज दिलेलं नाही. राज्य सरकार अंग चोरुन काम करत असल्याची परिस्थिती आहे. इतर राज्यांनी मदत जाहीर केली आहे, पण आपलं सरकार एक नवा पैसा खर्च करण्यास तयार नाही. केंद्र सरकारने राज्य सरकारला अतिरिक्त निधी दिला असून रेशनही पुरवलेलं आहे, असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.