13 बाधीत रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाचा निर्णय
बीड | वार्ताहर
माजलगाव तालुक्यातील नित्रुड आणि सुर्डी तसेच धारुर तालुक्यातील कुंडी या गावांमध्ये मिळून एकूण 13 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आता या गावांच्या तीन किलोमीटर परिसरात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कंटेनमेंट झोन जाहीर करत ही सर्व गावे निश्चित कालावधीसाठी बंद राहणार असून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
माजलगाव तालुक्यातील सुर्डी, राजेगाव, फुलसिंगनगर तसेच नित्रुड, रेखानाईकतांडा, मोहकुळतांडा, चंद्रभान तांडा, हरजळतांडा, शेरीतांडा, आनंदवाडी, साळवण तांडा, यासह धारुर तालुक्यातील कुंडी, जैतापूर, सुकळी, मुंगी, शेरीतांडा तहत देवठाणा व फकीर जवळा, माजलगाव तालुक्यातील वांगी व परळी तालुक्यातील तपोवन आणि खामगाव या सर्व 20 गावांमध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कंटेनमेंट घेऊन घोषित केला आहे. त्यामुळे पुढील अनिश्चित काळासाठी ही सर्व गावे बंद ठेवण्यात येत असून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Leave a comment