केज । वार्ताहर
केज तालुक्यातील मांगवडगाव येथील जमिनीच्या वादातून पारधी समाजातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींच्या खून प्रकरणातील बारा आरोपीना सत्र न्यायालयाने २६ मे पर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मांगवडगाव येथे दि.१३ मे रोजी रात्री गट नंबर १७१/३ या मधील १० एकर १२ गुंठे या वादग्रस्त व जमिनीचा दोन वर्षांपूर्वी पवार कुटुंबाच्या बाजूने निकाल लागला होता त्यामुळे बाबू पवार आणि त्याची मुले ही दि.१३ मे रोजी अंबाजोगाई येथून ट्रॅक्टरने मांगवडगाव शिवारातील जमिनीत पेरणीपूर्व मशागत करून जमीन ताब्यात घेण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधी गटातील मोहन निंबाळकर यांच्या कुटुंबातील लोकांना राग आला. त्यामुळे त्यानी कट रचून तलवार, कुऱ्हाड, पहार व टिकाव आणि गजाने मारहाण करून त्यांचा पाठलाग करून बाबू शंकर पवार वय ६० वर्ष व त्यांची मुले प्रकाश बाबू पवार वय ४५ वर्ष आणि संजय बाबू पवार वय ४० वर्ष तिघांचा खून करण्यात आला होता.
या प्रकरणी धनराज बाबू पवार यांच्या फिर्यादी वरून १) सचिन मोहन निंबाळकर वय ३२ वर्षे, २) हनंमुत मोहन निंबाळकर वय ३३ वर्षे, ३) राजेभाऊ काशिनाथ निंबाळकर वय ४५ वर्षे, ४) प्रभु बाबुराव निंबाळकर वय ७५ वर्षे, ५) बालासाहेब बाबुराव निंबाळकर वय ५५ वर्षे, ६) राजाभाऊ हरीचंद्र निंबाळकर
वय ३५ वर्षे, ७) अशोक अरूण शेंडगे वय २४ वर्षे, ८) कुणाल राजाभाऊ निंबाळकर वय १९ वर्षे, ९) शिवाजी बबन निंबाळकर वय ४८ वर्षे, १०) बबन दगडू निंबाळकर वय ८० वर्षे, ११) जयराम तुकाराम निंबाळकर वय २९ वर्षे, १२) अनंत बाबुराव इंगळे आणि १३) बाळासाहेब रामलिंग निंबाळकर सर्व रा. मांगवडगाव ता.केज आणि १४) संतोष सुधाकर गव्हाणे वय ४२ वर्षे रा. माळेगाव ता. केज या चौदा आरोपी विरोधात गु. र. नं. १०६/२०२० भा.दं. वि. १४३, १४७, १४८, १४९, ३०२, ३०७, १२०(ब), ४३५, ४२७ सह ४,२५ मोटार वाहन कायदा कलम शस्त्र प्रतिबंधक कायदा कलम १८४ आणि अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधक काय दा कलम ३(१) (जी) ३(२) (व्ही) (ए) ४(२) (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणी आरोपीना सत्र न्यायालय अंबाजोगाई न्यायालयाने दि. २१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपताच पुन्हा त्यांना सत्र न्यायालयात हजर केले असता पुन्हा त्यांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी वाढविण्यात आली आहे.या तिहेरी हत्याकांडाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करीत आहेत.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment