परळी । बालाप्रसाद व्यास

लॉकडाऊन काळात महिलांना आर्थिक मदत होईल म्हणून केंद्र सरकारने प्रत्येक महिलांच्या खात्यात जनधन खाते अंतर्गत पाचशे रुपये जमा केल्यानंतर ते पैसे काढण्यासाठी मंगळवारी (दि.7) पपरळी शहरातील अनेक बँका समोर तसेच ग्राहक सेवा केंद्रावर महिला आणि पुरुषांची कायदा मोडून प्रचंड रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

अखेर गर्दीला आवरण्यासाठी आणि त्यांना अंतर ठेवण्यासाठी पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉक डाऊन काळामध्ये नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तसेच जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून भारतातील प्रत्येक महिलांच्या जनधन खात्यामध्ये पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत.आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याची वार्ता परळी तालुक्यात पसरल्यानंतर आज सकाळी अकरा ते तीन संचारबंदी शिथिल वेळेमध्ये पैसे काढण्यासाठी महिलांनी सकाळी नऊ वाजल्यापासून प्रचंड रांगा लावल्या. या रांगेमध्ये महिलांच्या बरोबरीने पुरुषही थांबले होते सकाळी 11 वाजता बँका आणि ग्राहक सेवा केंद्र उघडण्यापूर्वी लोकांनी तोबा गर्दी केली. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा म्हणून सरकार वारंवार सांगत आहे परंतु पैशापुढे लोकांनी या नियमाला फाटा देत प्रचंड गर्दी केली.या गर्दीमुळे लोकांना विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून अखेर पोलीस बँका समोर येऊन लोकांना लाईनमध्ये लावत होते. परळी शहरात हे चित्र स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र तसेच ग्राहक सेवा केंद्राच्या समोर बघायला मिळत होते. स्वतःच्या जीवाची आणि इतरांची काळजी घेण्यासाठी जनतेने शासन आवहान करीत आहे त्याप्रमाणे कमीत कमी सोशल डिस्टन्सचा नियम पाळण्याची गरज आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.