चौसाळा । वार्ताहर
बीड तालुक्यातील चौसाळा येथील बाजारपेठ पुढील काही दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी दि.23 मे रोजी चौसाळा बाजारपेठ सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु राहील. याची चौसाळा व चौसाळा परिसरातील नागरिकांनी नोंद घ्यावी असे चौसाळा आवाहन ग्रामपंचायत कार्यालय, मार्केट कमिटी व आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे
बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. याशिवाय शेजारी असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील गिरवली येथेही बाधित रुग्ण आढळून आला आहे. हे गाव चौसाळ्यापासून जवळच असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चौसाळा ग्रामपंचायत, मार्केट कमिटी आणि आरोग्य विभाग याच्या सहविचाराने पुढील काही दिवसांसाठी शहरातील सर्व दुकाने शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढील निर्णय 26 तारखेला घेण्यात येईल असे ग्रामपंचायत कार्यालयाकडून सांगण्यात आले.
Leave a comment