अव्वल कारकूनास कार्यालयात येण्यास मनाईन
धारुर । वार्ताहर
धारूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार विटेकर यांना 28 दिवस क्वारंटाईन राहण्याच्या तर कार्यमुक्त अव्वल कारकून गणेश देवकर यांना तहसील कार्यालयात न येण्याची सक्त ताकीद बुधवारी (दि.20) तहसिलदार वंदना शिडोळकर यांनी दिली. धारूर तहसील कार्यालयातील दोन कर्मचारी औरंगाबाद येथून जावून आल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. याची दखल घेत तहसिलदार मॅडम यांनी ही कार्यवाही केली.
येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार हे रितसर पास घेवून आरोग्य तपासणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेले होते. औरंगाबाद जिल्हा रेड झोनमध्ये आहे. तपासणीहून आल्यानंतर ते तहसील कार्यालयात कामासाठी हजर झाले परंतु बाहेरील जिल्ह्यातून आल्यानंतर क्वारंटाईन राहण्याचा शासनाचा नियम असल्याने तो सामान्य व्यक्ती प्रमाणेच शासकीय कर्मचारी यांना देखील लागू होतो. सामान्य व्यक्तीला एक न्याय व शासकीय कर्मचारी यांना एक न्याय असे होवू शकत नाही त्यामुळे त्यांना 28 दिवस क्वारंटाईन राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या.तहसील कार्यालयातील अव्वल कारकून गणेश देवकर याना धारूर तहसील कार्यालयातून औरंगाबाद येथे कार्यमुक्त केले आहे. त्यांनाही तहसिलदारांनी कार्यालयात न येण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
Leave a comment