परस्परविरोधी तक्रारीवरुन आठ जणांवर गुन्हा
बीड । वार्ताहर
शहरातील पेठ बीड भागातील मोमीनपुरा येथे क्षुल्लक कारणावरुन शेजारी राहणारे दोन कुटुंब आमने-सामने आले. यावेळी तुंबळ हाणामारी झाली. परस्परविरोधी फिर्यादीवरुन आठ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला.
मोमीन हसीब मोमीन मुजीब (25, रा. मोमीनपुरा) या तरुणाच्या फिर्यादीनुसार, दारात ठेवलेल्या पाण्याच्या टाकीवरुन भांडणाची कुरापत काढून 19 रोजी दुपारी वाजता लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यांचे आई -वडील, भाऊ हे सोडवासोडव करण्यास आले तेंव्हा त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. मोमीन अब्दुल हादी अब्दुल वाहब, मोमीन सिध्दीक अब्दुल हदी, मोमीन सईद अब्दुल हदी, मोमीन सोहील अब्दुल हदी यांच्यावर गुन्हा नोंद झाला.मोमीन अब्दुल हादी अब्दुल वाहब (53, रा. मोमीनपुरा) यांनीही फिर्याद दिली. त्यावरुन मोमीन अब्दुल मजीब अब्दुल वहाब, मोमीन शोईब अब्दुल वहाब, मोमीन हसीब अब्दुल मुजीब, मोमीन मोईज अब्दुल मुजीब यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. गज, बतईसारख्या तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्यासह मोमीन सिध्दीक व मोमीन सईद ही दोन मुले जखमी झाले.
Leave a comment