वडवणी । वार्ताहर

सहा वर्षीय मतिमंद मुलीच्या उपचाराच्या खर्चाला कंटाळून पित्यानेच तिचा खून केल्याची घटना वडवणीत 12 मे रोजी घडली होती. या प्रकरणी आरोपी पित्याच्या कोठडीत बुधवारी न्यायालयाने दुसर्‍यांदा वाढ केली. 

वडवणी शहराच्याजवळ एका मुलीचा मृतदेह 12 मे रोजी आढळला होता. या प्रकरणात तपासादरम्यान पिता गणेश विठ्ठल शिंदे यानेच तिचा खून केल्याचे स्पष्ट झाले होते. मुलगी मतिमंद असल्याने तिच्यावर सतत उपचार करावे लागत असत यासाठी खर्च होत होता. उपाचाराच्या खर्चामुळे मुलीलाच त्याने संपवून टाकले होते.सहायक पोलिस निरीक्षक महेश टाक हे या प्रकरणी तपास करत आहेत. सुरुवातीला न्यायालयाने गणेश शिंदेला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. बुधवारी ही कोठडी संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 23 मे पर्यंत त्याच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.