पहिल्यांदाच शंभरपेक्षा अधिक स्वॅब पाठवण्याची वेळ
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात शनिवार ते मंगळवार या चार दिवसात एकुण 12 जण कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर खबरदारी म्हणून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचेही स्वॅब घेतले जात आहेत. बुधवारी (दि.20) एका दिवसात बीड जिल्ह्यात एकुण 114 थ्रोट स्वॅब अहवाल तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. महत्वाचे हे की, जिल्ह्यातून एकाचवेळी 100 पेक्षा अधिक स्वॅब तपासणीला जाण्याची पहिलीच वेळ आहे. आता या रिपोर्टकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बुधवारी नव्याने 114 लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 20 कोरोनाबाधित आढळले होते. पैकी आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील एका रुग्णाचा मृत्यू तर सहा उपचारासाठी पुण्याला गेले आहेत. त्यामुळे त्यांची संख्या जिल्ह्याच्या एकूण आकडेवारीतून वगळण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांचा एकूण आकडा 13 राहिला आहे. पैकी पिंपळा येथील एक कोरोनामुक्त झालेला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच बुधवारी आणखी जिल्ह्यातून 114 स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत तपासणीला पाठविले आहेत. यात कवडगाव थडी (ता.माजलगाव) येथील दोघांचे स्वॅब दुसर्यांदा पाठवण्यात आले आहेत. सर्व रिपोर्ट रात्री उशिरापर्यंत येतील अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
Leave a comment