सिरसाळा | वार्ताहर

 

एकमेकांच्या प्रेमात पार बुडालेले जोडपे विवाह करून राजस्थानात पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या लातूर जिल्ह्यातील किनगाव येथील युगलास मोठ्या शिताफीने  मंगळवारी चार वाजेच्या सुमारास सिरसाळ्यातुन ताब्यात घेतले.

 

  अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे भेळचा व्यावसाय असणाऱ्या रतनलाल साळवी नावाच्या युवकाने गावातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचं आमिष दाखवून 1 मे रोजी गावातून पळविले. त्याच्यावर 3 तारखेस किनगाव पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा ही नोंद करण्यात आला. दरम्यान त्या  मुलाच्या मोबाईल लोकेशन हे सिरसाळा दाखवत असल्याने किनगाव पोलिसांनी सिरसाळा पोलिसांशी संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला.स पो नि श्रीकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ विष्णू फड रफिक पठाण यांनी येथील सोनपेठ रस्त्यावरील एका वीटभट्टीवर मोठ्या शिताफीने त्या दोघांना ही  ताब्यात घेतले.तर त्यांना किनगाव येथे घेऊन जाण्यासाठी

त्या मुलीच्या आई सह स पो नि गजानन अन्सापुरे पो कॉ सय्यद महबूब हे एका खासगी वाहनाने सायंकाळी सहा वा. सिरसाळ्यात दाखल झाले. मुलीच्या जवाबावरून पुढील कारवाई केली जाईल असे सहायक निरीक्षक  गजानन अन्सापुरे यांनी सांगितले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.