आष्टी । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आजूबाजूच्या गावांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. कडा येथील एका औषध विक्रेत्याच्या आणि अंडे विक्रेत्याच्या संपर्कात या बाधीतांचा एक नातेवाईक आल्याने सतर्कता म्हणून गावातील गल्ल्यांचे रस्ते बंद केले आहेत.
सांगवी पाटण येथे मुंबईतील धारावी येथून काही व्यक्ती आले होते. आल्यापासून ते नातेवाईकांच्या घरापासून दूर असलेल्या झोपड्यामध्ये क्वारंटीन म्हणून वेगळे राहत होते. या मुंबईकरांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील त्यांचे नातेवाईक कुठे गेले होते. याचा तपास आरोग्य विभाग करत आहे. सांगवी पाटण येथील हा नातेवाईक कडा येथे आला होता त्याने दोन ठिकाणी भेटी दिल्या असल्याचे उघडकीस आल्याने कडा ग्रामपंचायतीने तीन दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सरपंच दिपमाला अनिल ढोबळे यांनी दिली.
Leave a comment