बीड । वार्ताहर
वैश्विक महामारी कोरोनाचे ओढावलेले संकट आणि यातून होणारे बळीराज्याचे हाल परळी मतदार संघातील बर्दापूर येथे नवीन हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे ही परिसरातील नागरिकांची समाजाभिमुख मागणी मा.पंकजाताई मुंडे व जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांना जि.प सदस्य श्री.अविनाशजी मोरे यांनी कळवली हा विषय अनेक दिवसा पासून प्रलंबित होता बर्दापूर कराची व्यथा खा.प्रीतमताई समोर आल्या नंतर.
जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष खा.प्रीतमताई यांनी ऋउख (फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे) वरिष्ठ अधिकारी श्री.रंजनजी यांच्याशी तात्काळ संपर्क साधून बर्दापूर येथील नवीन हरभरा खरेदी केंद्रास तात्काळ मान्यता देण्यात यावी व परिसरातील शेतकर्यांचा हरभरा तात्काळ खरेदी करावा असे निर्देश दिले. श्री.राकेश रंजन यांनी ही लवकरात लवकर हरभरा खरेदी केंद्र सुरू होईल असे आश्वासन खा.प्रीतमताईंना दिले या मुळे परिसरातील बळीराजा सुखावला आहे. खा.प्रीतमताईंच्या तत्परतेचे परिसरात सर्वत्र स्वागत होत आहे व कोरोनाच्या संकटात बर्दा पुरकरांना व शेतकर्यांना या निर्णयाने दिलासा मिळालेला आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment